सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पालघर
पाणी म्हटले की एक जीवनच आहे. पाणी नसले तर आपले जीवनच नाही. कारण पाण्याविना आपण जगू शकत नाही जर आपल्याला पाणीच नसेल तर जगावे कसे. असे कितीतरी प्रश्न उद्भवतात. आणि अश्याच प्रकारे मोखाडा तालुक्यातील सायदे मारुतीवाडी धरणाची पाणी गळती गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे पंरतु धरणाचे दुरुस्ती चे काम हाती घेतले नसुन त्यामुळे धरणा खालील गावांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते,या बाबतीत श्री प्रदीप वाघ यांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे येत्या काही दिवसांत जर काम सुरू झाले नाही तर तिव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच अनेक पाणी पुरवठा योजना देखील अपुर्ण अवस्थेत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे टॅकर चा खर्च संबंधित जबाबदार यंत्रणे कडुन वसुल करावा असे ही मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037