सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते यापूर्वी झारखंड राज्याचे राज्यपाल होते.
सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी केली आहे.
कोण आहेत नवीन राज्यपाल रमेश बैंस
रमेश बैंस यांचा जन्म २ आँगस्ट १९४७ रोजी झाला. १९७८ मध्ये ते पहिल्यांदाच रायपूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८० ते १९८४ दरम्यान मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.१९८२ ते १९८८ दरम्यान ते मध्यप्रदेशच्या मंत्रीमंडळात होते.१९८९ मध्ये रमेश बैस यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले.छत्तीसगढ़-मध्यप्रदेशाचे विभाजन झाल्यावर त्यांनी रायपूर लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले. ते सात वेळा खासदार होते. त्रिपुरा आणि झारखंडचे ते राज्यपाल होते. १९९८ ते २००४ या दरम्यान केंद्रीयमंत्री असताना त्यांनी विविध मंत्रीपदे भूषवली.
राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
एल गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037