अन्य

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे ऍड गुणरत्न सदावर्ते ह्याच्यावर धार्मिक भावना भडकवल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी भद्रकाली पोलीस स्टेशन ला निवेदन

Spread the love

सुनील शिन्दे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , नासिक

                   दिनांक 29/01/2023 रोजी मुंबई येथे काढण्यात आलेल्या हिंदु जागर मोर्चा मध्ये सामील असलेले अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुस्लिम धर्माच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू पुरस्कार प्रयत्न केला तसेच सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले अजमेर येथील सुफी संतख्वाजा गरीब नवाज यांच्या विषयी अपमान जनक शब्दांचा वापर केला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुखी मुस्लिम द्वेष शब्द टाकून संविधानाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सुद्धा अपमान करण्याचा धार्मिक द्वेष मनात ठेवून हिंदू मुस्लिम दंगल लावण्याचे हेतूने विकृत मानसिकेतून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जवळच्याच काळात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे हेट स्पीच देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे तसेच भारतीय संविधानानुसार धार्मिक द्वेष निर्माण करणे महापुरुषांचा अपमान करणे अशा प्रकारचा गुन्हा अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात यावा असा निवेदन मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांच्या मार्फत भद्रकाली पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक यांना देण्यात आले.

                त्यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अजीज पठान, रशीद चांद, मुखतार शेख, इब्राहिम अत्तार, शकील तांबोली,ईमरान तांबोळी, अकील खान, रफिक साबीर, फिरोज मंसुरी व सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राचे नाशिक शहर संघटक फहिम शेख हे उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत