सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी ३० जानेवारी, २०२३ रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दि. ३० जानेवारी,२०२३ रोजी सकाळी ८.०० ते दु. ४.०० या वेळेत मतदान होणार आहे.
विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.
पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे होणार सुलभ
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणूक-२०२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी खालील लिंक दिली आहे. या लिंक द्वारे मतदारांना आपले नाव शोधणे सुलभ होणार आहे.
https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/
मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी २०२३ रोजी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037