सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
नाशिकच्या युवा ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातुन १ जानेवारी २०२३ पासुन नाशिक शहरातील जनतेसाठी मोफत नवीन रुग्णवाहिका होणार उपलब्ध आहे. नाशिक शहरातील नागरिकांना वेळेत उपचार मिळावे या दृष्टीने सदरची रुग्णवाहीका नागरिकांच्या सेवेत युवा ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अमोल दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु होणार आहे.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण व नाशिक शहर व ग्रामीण, इगतपुरी तालुका, सिन्नर तालुका, त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यामातुन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर आण्णा पाटील यांच्या वतीने दिनदर्शिका वाटण्यात येत आहे. त्याचे अनावरण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व महाराष्ट्र राज्याचे वैदकीय व ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा सरचिटणीस विक्रांतजी पाटील,भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे,आमदार सीमा हिरे,नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील,माजी नगरसेविका लता दिनकर पाटील,युवा ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037