इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक
नासिकरोड दिनांक 26नोव्हेंबर 2022 रोजी 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नासिक संचलित विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा, कार्यशाळा नशिकरोड येथे दिव्यांग धारा प्रतिष्ठान आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संवाद सेतू स्पर्धा 2022 संपन्न झाल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.कोमल मेहेरोलिया गिरीधर नगरसेविका, शुभदा ओक सातपुते मुंबई दिव्यांग धारा प्रतिष्ठान निर्माती नारियानी मोहिनी बँक ऑफ महा.च्या मॅनेजर सेवानिवृत्त संस्थेच्या सचिव सौ सुहासिनी घोडके, दीपक मगर खजिनदार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन तसेच संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करून झाली.
सदर नाटिकेंसाठी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित व मानसिक दिव्यांग मुलांच्या मनोविज्ञानाशी निगडित विषय देण्यात आला होता. नाशिक, दादर, ठाणे, डोंबिवली, कोकण येथे पहिली फेरी होऊन अंतिम फेरी मुंबई येथे होणार आहे. 21 संस्था मधील 320 स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धांचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ दिनांक 7 जानेवारी शनिवारी सकाळी 10 ते 1 या वेळात सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई येथे होणार आहे.
संस्कार भारतीचे कलाकार सतीश मोहोळ नाटककार, लेखक चैतन्य गायधनी दिग्दर्शक, अभिनय, नेपथ्यकार वृषाली घारपुरे सेवानिवृत्त मुख्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पडसाद कर्णबधिर विद्यालय नाशिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व संस्थापक, मुख्याध्यापक सौ सुचेता सौंदणकर, शिक्षक शिक्षकेतर
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037