सागर पाटील / प्रतिनिधी , दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

आग, पूर, गर्दीसह इतर संकटातील उपाययोजनांबाबत कार्यशाळेत मंथन
नाशिक महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) आणि यूएनडीपी (संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन आणि वातावरण बदल या विषयावर दोन दिवसांचे प्रशिक्षण मनपा अधिका-यांसाठी आयोजीत करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात आज दि. 29 सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. अतिरीक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी यशदाचे सेंटर डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचे संचालक कर्नल व्हि. एन. सुपनेकर (रिटायर्ड) यांचे स्वागत केले. कार्यशाळेच्या सुरुवातीला अशोक आत्राम यांनी आधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आवश्यकतेबाबत मार्गदर्शन केले. यूएनडीपीचे प्रकल्प समन्वयक मोहम्मद मुदस्सीर यांनी दोन्ही दिवसांतील सत्रांची रुपरेषा सांगितली. 30 सप्टेंबरला साडे पाच वाजता प्रशिक्षणाचा समारोप होणार आहे.

सुपनेकर यांनी मार्गदर्शनामध्ये वातावरणातील बदल आणि आपत्ती व्यवस्थापन यांची सांगड घालून नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. कमी, मध्यम आणि दूरचा कालावधी अशा तिनही टप्प्यातील कृती आराखडा महत्वाचा आहे. शहरामध्ये स्थलांतर म्हणजेच आपत्तीचे ठिकाण खाली करण्याची योजना तयार हवी. त्यासाठी वारंवार सराव, मॉक ड्रील करण्याची गरज व्यक्त केली. डिझास्टर मॅनेजमेट अँक्ट 2005 बद्दल माहिती देत सुपनेकर यांनी महानगरपालिकेच्या जबाबदारीवर विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण यंत्रणेवर मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. राजेश्री व-हेडी आणि पर्यावरण बदल परीणाम, पूर धोके मुल्यांकन या विषयावर पुण्याच्या विशाखा चंदेरे आणि केटीएचएम कॉलेजच्या प्राध्यापिका विशाखा वाघ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभारी अतिरीक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे, नगर रचना उपसंचालक हर्षल बाविस्कर, मुख्य अग्नशिमन अधिकारी संजय बैरागी, आयटी विभाग संचालक नितीन धामणे, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मलेरीया विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके, पशू संवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सचिन जाधव, नितीन पाटील, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, मयूर पाटील, मदन हरीश्चंद्र, कैलास राबडिया, नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी अधिकारी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

