सलिम पटेल / प्रतिनिधी , दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

माहिती अधिकार कायदा तज्ज्ञ संदीप सावंत यांचे मार्गदर्शन
नाशिक महानगर पालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीचे (यशदा) व्हिजिटींग फॅकल्टी आणि माहिती अधिकार कायदा तज्ज्ञ संदिप सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी अतिरीक्त आयुक्त अर्चना तांबे यांनी सावंत यांचे स्वागत केले. संदीप सावंत यांनी आपल्या खुमासदार शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. अधिकारी आणि कर्मचा-यांनीही सांवत यांच्या व्याख्यानाला मोठी दाद दिली. कर्मचा-यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही सांवत यांनी अगदी सोप्या शब्दात विविध उदाहरणे देऊन उत्तरे दिली. नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोकशाहीत का?, कसे झाले?, कुणी केले? असा विचारण्याचा अधिकार आहे. प्रजासत्ताक मध्ये नागरीकांचा आवाज सरकारी यंत्रणेपर्यंत पोचला पाहिजे, त्यासाठी माहिती अधिकार या साधनाचा उपयोग केला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कामकाजात पारदर्शकता ठेवा, माहिती निर्माण करु नका, जशी असेल तशी माहिती द्या, समाधान होईपर्यंत उत्तरे द्यायला हवीत, असे मार्गदर्शन करतानाच कायद्याचा दुरुपयोग करुन अपवृत्ती वाढल्या असल्याच्या मुद्याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले. निरर्थक प्रश्न विचारणा-यांना कसे सामारे जावे ? याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

यावेळी ॲड सई सावंत, अतिरीक्त आयुक्त अशोक आत्राम, उपायुक्त करुणा डहाळे, डॉ. दिलीप मेनकर, सहाय्यक आयुक जवाहरलाल टिळे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा परीक्षक बोधीकिरण सोनकांबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनिता धनगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, मयूर पाटील, मदन हरीश्चंद्र, कैलास राबडिया, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, रविंद्र धारणकर, नितीन पाटील आदी अधिका-यांसह कर्मचारी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी सुत्रसंचालन केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

