अनिस शेख/ उपसंपादक, दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात दिव्यांगांना स्वावलंबन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते 15 जणांना प्रातिनिधीक स्वरुपात यूडीआयडी कार्ड प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पंचवटी कार्यालयाकडून एकूण 128 दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शासनाच्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी आयुक्तांनी दिव्यांगांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला मनपा उपायुक्त विजयकुमार मुंढे, पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया, नवीन नाशिक विभागीय अधिकारी मयूर पाटील, नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, दिव्यांगांना मदत करणा-या प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, पंचवटी कार्यालय अधिक्षक मंगेश वाघ, सहाय्यक अधिक्षक भूषण देशमुख उपस्थित होते. अर्ज ऑनलाईन कामासाठी बबलू मिर्जा यांच्यासह कार्यक्रम यशस्वितेसाठी जाहीरात परवाना विभागाच्या सिमा गायकवाड यांनी मदत केली.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

