प्रशांत वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

दिनांक 21/12/2022 रोजी झाप ग्रामपंचायत मधील जल जीवन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.या योजनेचा झाप ग्रामपंचायत मधील 10 पाडे मधील 2975 लोकसंख्येला फायदा होणार आहे.यावेळी येथील लोकनियुक्त सरपंच श्री.एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की,गेल्या 2016 पासून काळ शेती धरणा वरून झाप ग्रामपंचायत मधे पाणी यावे हा ड्रीम प्रोजेक्ट उराशी ठेवून यासाठी प्रयत्न चालू होते .या अगोदर मुख्यमंत्री पेयजल योजना मधून सदर नळपाणी पुरवठा योजना करीता पाठपुरावा चालू होता परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे त्यावेळी सदर योजना मंजूर होऊन टेंडर प्रोसेस ला कॅन्सल झाली होती.त्यानंतर ही पाठ पुरावा करीत सदर योजना जल जीवन योजनेतून मंजूर होऊन आज तिचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच झाप ग्रामपंचायत मधील सर्व घराला पाणी मिळणार याचे समाधान आहे .यावेळी जव्हार पंचायत समितीच्या सभापती श्रीमती विजयाताई लहारे मॅडम (सभापती, प स जव्हार) यांनी बोलताना सांगितले की, सदर योजना एकदाच होणार आहे त्यामुळे या योजनेचा उदेश्य सफल झाली पाहिजे .यावेळी श्री सुरेश कोरडा आहे (माजी सभापती), श्री. चंद्रकांत रंधासाहेब (माजी उपसभापती), श्री राजेश पाध्ये(उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जव्हार) श्री भावेश पाटील (कनिष्ठ अभियंता) श्री संकेत पगार(कनिष्ठ अभियंता) श्री एकनाथ दरोडा (सरपंच ग्रापंचायत झाप) श्री दयानंद लहारे(सामजिक कार्यकर्ता),उप सरपंच सखाराम वड,अमोल भोये (ग्रामसेवक ) ग्रामपंचायत सदस्य विलास बागुल, महेंद्र गवारी, वंदना दरोडा, अनिता खानझोडे, युवराज वाघ, कल्पना वातास, लता राथड, ग्रामपंचायत कर्मचारी, जगन खानझोडे, काशिनाथ तेलवडे व लक्ष्मण खानझोडे, नामदेव गवारी, देवराम गवारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

