राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता, चांदवड

चांदवड शहरातील महालक्ष्मी नगर ते गुजराथी नगर या रस्त्याचे काम मागील ८ ते ९ महिन्यांपासून प्रलंबित पडलेले आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने दि. २० डिसेंबर २०२२ रोजी उपविभाग अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व चांदवड पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले व महालक्ष्मी नगर व गुजराथी नगर येथे नवीन रस्त्याच्या मागणीसाठी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
चांदवड शहरातील महालक्ष्मी नगर ते गुजराथी नगर या रस्त्याचे काम मागील ८ ते ९ महिन्यांपासून प्रलंबित पडलेले आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने या रस्त्याला आकार देऊन यावर फक्त खडी अंथरुण ठेवलेली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण देखील करण्यात आलेले नाही. या रस्त्यात सर्वत्र खडीच – खडी पडलेली आहे. यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पायी चालणाऱ्या लोकांनाही या रस्त्यावरुन चालताना खूप अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वाहन चालकांना व पायी चालणाऱ्या लोकांना या रस्त्यावरुन चालतांना खुप कसरत करावी लागत आहे. हा रहदारीचा मार्ग असल्याने येथे खुप वर्दळ असते. परंतु, येथे व्यवस्थित रस्ता नसल्याने लोकांचा येण्या – जाण्याचा मार्ग बंद पडला आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने देखील चालवता येत नाहीत. यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. येथे किरकोळ अपघात देखील होतात. ८ ते ९ महिने झाले तरी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येत नसल्याने नागरिकांत संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे. ‘या रस्त्यावरून चालायचे कसे ?’, हा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे.

८ ते ९ महिन्यांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली. परंतु, या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने या रस्त्यावर फक्त खडी टाकली व काम अपुर्णच ठेवले. अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. या रस्त्याच्या कामाचा निधी हडपण्यासाठीच या ठेकेदाराने, इंजिनीअर व नगरपरिषद अधिकाऱ्यांनी संगनमताने या रस्त्यावर फक्त खडी अंथरुण रस्त्याचे काम अर्धवट सोडले. नगरपरिषद अधिकारी या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. अशा प्रकारचे अर्धवट व नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव प्रशासनाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व अशा ठेकेदारांना महाराष्ट्रात कुठेच काँक्रिटीकरणाचे काम देऊ नये. या ठेकेदाराचे लायसन्स रद्द करावे. या अधिकाऱ्याच्या संगनमताच्या ठेकेदारावर लवकरात – लवकर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महालक्ष्मी नगर ते गुजराथी नगर या रस्त्याचे काम तत्काळ पुर्ण करण्यात यावे. हा रस्ता नवीन व चांगल्या दर्जाचा बांधण्यात यावा व जनतेला रस्त्याचे इन्स्ट्रुमेंट दाखवून रस्त्याचे काम करण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने नगरपरिषदे समोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला. यावेळी माजी सैनिक बाळासाहेब शार्दुल, याकुब शहा, कृष्णा खैरे, साहील शाह, कुणाल जाधव, विकास लुटे, निलेश निकम, निखिल ढेपले, चंदन बेलदार, सनी मोरे, साजन वानखेडे, ओमकार जाधव, सागर काकड, जुबेर शेख, चंद्रकांत कसबे, रोशन जाधव व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

