अमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे

हडपसर सोलापूर रोड वर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. एका कंटेनर चालकाने दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भरधाव वेगात आलेल्या मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि एक कार उलटली. कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला आणि झाड नागरिकांच्या अंगावर पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गाडीतळ परिसरात कंटेनर चालकाने दुचाकी चालकाला वाचवण्यासाठी रिक्षाला धडक दिली. त्यामुळे कंटेनरवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि अन्य चार ते पाच रिक्षा उलटल्या. कंटेनर झाडावर आदळल्याने झाड उन्मळून पडले. यानंतर मिक्सरचा डबा उलटला. यावेळी कंटेनर खाली पडून रिक्षाचा चक्काचूर झाला.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

