रक्षक अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे

तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची असं वक्तव्य केलं होतं दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भूजबळ यांनी तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची असं वक्तव्य केलं होतं त्यांंच्या या वक्तव्याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, हे भुजबळांचं वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची भूमिका नाही असा खुलासा केला आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमातनंतर बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
छगन भुजबळ यांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. असं पक्षाने आधीच सांगितलं आहे. प्रत्येकाला स्वत:ची भूमिका मांडण्याच अधिकार आहे. पण पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पीएफआयवर बोलताना ते म्हणाले की, देशात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे. भारतात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर तसं झालं असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा घोषणा देण्याची. पण राज्य सरकार केवळ आमचा तपास सुरु आहे, असं म्हणत आहे. पण तपासाला इतका वेळ लावायची काहीच गरज नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

