राजेंद्र कोल्हे /प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड

रविवार संध्याकाळ पासून चालणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कांद्याची रोपे, मक्का, सोयाबीन तसेच आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे सर्व पिकं भुईसपाट झाल्याने सडायला लागली. मोठ्या प्रमाणात खर्च करून कांदा लागवड केलेली ती पण सडायला लागली.मक्याच्या पिकासह इतर सर्व पिके भुईसपाट झाली आहेत.
सोमवारी मा.आ.डॉ राहुल दादा यांनी चांदवड तालुक्यातील काजी सांगवी-विटावे शिवारात झालेल्या नुकसानाची पाहणी करुन शासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनाम करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी मा.आ.राहूल आहेर सोबत पंचायत समितीचे मा.सभापती डॉ.नितिन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. मनोज शिंदे, श्री.साईनाथ कोल्हे, श्री.जगदीश कोल्हे, श्री.मन्सूर भाई मुलानी, श्री.भरत मेचकूल आदीसह तहसीलदार श्री. प्रदीप पाटिल गटविकास अधिकारी श्री.महेश पाटील तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

