जोहरान पठाण / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक.

दरवर्षी मंडळाकडून साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा यांना त्यादृष्टीने नियोजन करता येते. हे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वृत्त आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे इयत्ता दहावी व बारावीची लेखी परीक्षा घेतली जाते. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या संभाव्य परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.
बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होईल, तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे तयारी करताना योग्य नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रकाच्या तारखा दिवाळीअगोदर मंडळाने जाहीर केल्या आहेत. विस्तृत आणि अंतिम वेळापत्रक मंडळाकडून नंतर जाहीर केले जाणार आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

