अरशद अन्सारी/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,जव्हार

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तालुका जव्हार हळूहळू आता शासन तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने सुधारित होण्याच्या मार्गावर येत आहे असाच एक महत्त्वाची प्रकल्प म्हणजे ग्रामीण भाग झाप ग्रामपंचायत मधील धोंडपाडा गावात पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि टाटा मोटर्स यांच्या एकत्रीकरणातून एक खिडकी योजना सक्रिय झाली असून यामुळे स्थानिक नागरिकांची कामे होण्यास गती मिळणार आहे.
या ग्रामपंचायत मधील नागरिकांना बिरसा मुंडा विहीर योजना, संजयगांधी निराधार योजना तसेच विविध पेंशन योजना या साठी लागणारी महत्वाची कागदपत्र जमवूनही, संगणकावर ऑनलाईन प्रणाली द्वारे नोंदणी करावी लागते. ही सर्व प्रक्रीया झाल्यानंतर संबंधीत योजना लाभार्थ्याला मिळते. बऱ्याचदा योजनेसाठी आवश्यक कागदपत्र लाभार्थ्यांकडे नसतात, किंवा ते कुठून प्राप्त होतील याची माहीती नसते. या बाबींचा सारासार विचार करीत राज्यशासनाने टाटा मोटर्स व बायफ या संस्थांसोबत करार करून पालघर जिल्ह्यात प्रथमच ‘एक खिडकी योजना’ झाप ग्रामपंचायत मधिल धोंडपाडा येथे राबवली आहे. या संस्थेने पुढील पाच वर्षांसाठी झाप ग्रामपंचायत दत्तक घेतली आहे.

या आधी नागरिकांना कोणत्याही शासकीय कामाकरिता जव्हार शहरात पदरमोड खर्च करून शेतीचे किंवा हातातले काम सोडून जावे लागते बऱ्याचदा खर्च करून केलेली फेरी देखील फुकट जात असते परंतु या एक खिडकी योजनेमुळे येथील नागरिकांचा वेळ खर्च त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक मनस्ताप देखील वाचणार आहे.
या वेळी जव्हार पंचायत समिती गटविकास अधिकारी समीर वाठारकर, तांत्रिक अधिकारी रविंद्र अहीरे, बहुजन विकास आघाडी, झाप ग्रामपंचायत माजी सरपंच एकनाथ दरोडा टाटा मोटर्सच्या पियुशी सोणपाल , शैलेश माहुलिकर पंचायत समीती माजी सदस्य सुधाकर वळे, झाप ग्रामपंचायत माजी सरपंच वंदना दरोडा, संगणक चालक जगण खानझोडे व झाप ग्रामपंचायत मधिल नागरीक उपस्थित होते. जात ग्रामपंचायत मधील गावांमध्ये सुधारणा होण्यासाठी एकनाथ दरोडा विशेष प्रयत्न करीत असून नागरिकांनाही त्यांचा काम करण्यासाठीचा आटापिटा लक्षात येत असून या भागाच्या समस्या दूर होण्यासाठी दरोडा यांच्या पाठीशी राहणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी बोलताना सांगितले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

