दिनेश गोसावी/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता,पिंपळगाव बसवंत

घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरवाडे येथे घडली. पती व पत्नीचा किरकोळ वाद हा मोठ्या भांडणात रूपांतर झाले.यामध्ये पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे.
पिंपळगाव बसवंत लगत असलेल्या शिरवाडे वणी येथील सदर प्रकार आहे.हत्या ही पतीने त्याच्या पत्नीच्या माहेरीच केली आहे.सदर घटनेचा गुन्हा पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील एकलहरे येथील महिला जानव्ही नामदेव महाले ही माहेरी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे पती नामदेव महाले यांच्यासोबत आली होती. शिरवाडे वणी येथे गेले असता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.त्या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात होऊन पती नामदेव उत्तम महाले याने लाकडी दांड्याने पत्नी जानव्ही महाले हिच्या डोक्यात वार केला,व त्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली व तिच्या डोक्याला जास्त मार लागल्याने तिचा यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.पत्नी मृत्यू पावली हे बघून पतीने घटनास्थळावरून धूम ठोकली व फरार झाला आहे.
या सर्व घटनेची माहिती जानव्ही च्या भावाला कळताच भाऊ अशोक बाळू वाघ (वय 50) यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस साहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

