रमिन काद्री/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,येवला

अंदरसुल ता. येवला येथील गवळी वस्तीवर शेतकऱ्यांनी बैल जोडी उपलब्ध नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्याचे ठरवले. श्रावण महिन्यातील हा अखेर समजला जाणारा हा सण सर्व धर्मीय मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात परंतु अंदरसुल गावात मात्र गवळी वस्तीवर बैलजोडी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यावर भर दिला.

आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या सणाचे मुख्य केंद्रबिंदू म्हणजे बैल. भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र औद्योगिक क्रांती झाल्याने शेतीसाठी पूरक असणाऱ्या बैल आणि इतर प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वर्षभर शेतीमध्ये एखाद्या मनुष्य प्रमाणे बैल अहोरात्र कष्ट करत असतात.पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांकडे दोन दोन बैल जोडी नाही परंतु घरोघरी ट्रॅक्टर मात्र उपलब्ध आहे. बैलांप्रमाणेच ट्रॅक्टर हे जरी यंत्र असले तरी शेतीसाठी आजकाल ट्रॅक्टरचाच उपयोग जास्त होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा पोळा करण्याचे ठरविले.

येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला बैलजोडीचा मान दिल्याने परिसरात सर्वत्र चर्चेचा हा विषय ठरत आहे. बैलांप्रमाणेच चक्क ट्रॅक्टरला हार, फुगे, गोंडे व झेंडे तसेच जमेल तशा पदधतीने सजवून परिसरातील हनुमान मंदिरास प्रदक्षिणा घालून पोळा सण साजरा केला. याप्रसंगी ओंकार गवळी, माधव गवळी, वसंत गवळी, कचरू गवळी, दगू गवळी, पोपट गवळी, राजेंद्र सोनवणे, भास्कर गवळी, भगीनाथ गवळी आदींनी यात सहभाग घेतला.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

