मालेगाव द्याने रमजानपुरा येथून चोरी गेलेला मुध्येमाल जप्त करत (२) आरोपीनां अटक प्रतिनिधी शाहीद शेख मालेगाव मालेगाव द्याने रमजानपुरा येथून चोरी गेलेला मुध्येमाल जप्त करत आरोपी अटक करण्यात आले
मा. सहा. पोलीस निरीक्षक, द्याने रमजानपुरा पोलीस ठाणे मालेगाव यांची कामगिरी वरील गु.र.नं.७६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे दिनांक १७/०५/२०२६ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेकरीता.पोहवा. २२८० वराडे सोबत पोहवा.९३६ सर्वत्सरकर स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामिन.असे उपलब्ध सि.सि.टि.व्ही फुटेज पाहत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे सो, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामिण यांनी फोनव्दारे कळविले की, त्यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली आहे की, सदर गुन्हा इसम नामे १) अबुबकर निहाल अहमद वय-३० वर्षे, रा.गट नं.१५२, प्लॉट नं.११, मयुर मेडीकलच्या पाठीमागे नवकिरण सायजिंग जवळ रमजानपुरा मालेगाव २) ज्ञानदेव सदा तांबे वय-२१ वर्षे, रा. जामनेरी ता.नांदगाव जि. नाशिक सध्या रा.जाजुवाडी पॉलिटेक्निक कॉलेजच्या पाठीमागे मालेगाव यांनी केली आहे. करीता सदर इसमांचा शोध घेतला असता सदरचे इसम मिळून आले तेव्हा त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयातील मुद्देमाल आरोपी क्रं.२ यांच्या ताब्यातील गाडी क्रं. MH.४१ AU.७९१६ या वाहनाचा वापर करुन चोरी केली असल्याबाबत कबुली दिली असुन सदर चोरलेला कापडाचे तागे, कटर मशिन, XTRA POWER कंपनीचे पाते व गुन्हयात वापरलेली गाडी हे स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव जि. नाशिक येथे हजर केल्याने गुन्हयात वापरलेली गाडी व कापडाचे तागे, कटर मशिन, XTRA POWER कंपनीचे पाते दोन पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केली त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे.
१) ५४,०००/-रु.किं.त्यात २००० रु. किंमतीचा व १०० मिटर लांबीचे कापड असलेला एक तागा, असे एकुण २७ नग कापडाचे तागे, किं.अं.
२) २,५०,०००/-रु. किं. महिंद्रा सुप्रो मिनी गाडी क्रं. MH.४१ AU. ७९१६ हि सफेद रंगाची त्यावर पिवळे पट्टे असलेली
३) ५,०००/- रु.किं.चे एक PRO CUT कंपनिचे हिरव्या 17/05/2026या रंगाचे त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असलेले कटर
मशिन
४)१,५००/- रु.कि.ची एक DCJ LI-ION कंपनीची २१ वैटची काळ्या रंगाची बैटरी
५) ००.००/- रु.कि.चे एक हिरव्या रंगाचे XTRA POWER कंपनीचे पाते
३,१०,५००/- एकुण किंमत
येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा गुन्हयातील कापडाचे तागे, कटर मशिन, XTRA POWER कंपनीचे पाते व गुन्हयात वापर केलेली गाडी मिळून आली आहे. तरी सदर गुन्हयातील आरोपी नामे १) अबुबकर निहाल अहमद वय-३० वर्षे, रा.गट नं.१५२, प्लॉट नं.११, मयुर मेडीकलच्या पाठीमागे नवकिरण सायजिंग जवळ रमजानपुरा मालेगाव २) ज्ञानदेव सदा तांबे वय-२१ वर्षे, रा. जामनेरी ता. नांदगाव जि. नाशिक सध्या रा. जाजुवाडी पॉलिटेक्निक कॉलेजच्या पाठीमागे मालेगाव यांना मुद्देमालासह
त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे
