कणकोरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. सिन्नर (कणकोरी) दिनांक -१५-०४-२०२६. तालुक्यातील कणकोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी गावातील राजवाडा येथे चावडीच्या पटांगणात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील प्राथमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच गावातील माजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री रामनाथ पुंजा सांगळे, दादाहरी शिवराम सांगळे, शिवराम विष्णू सांगळे, भाऊसाहेब दादा शिंदे, दशरथ काशिनाथ सावंत, सुनील जनार्दन अहिरे, अनिल यादव अहिरे, अमोल अहिरे, सुधीर अहिरे, भूषण जगन्नाथ अहिरे, अमोल वसंत विधाते, वसंत सिताराम विधाते, राजू अहिरे ग्रामपंचायत शिपाई, तसेच अंगणवाडी शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. प्रथम शाळेतील मुलांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील चिमुकल्यांनी बाबासाहेबांविषयी आपले व्यक्तिगत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल भाऊ कापुरे यांनी केले. यानंतर धम्मवंदने साठी मार्गदर्शन भूषण अहिरे यांनी केले. तसेच शेवटचे भाषण धनपुरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री रामनाथ पुंजा सांगळे यांनी केले. सांगळे यांनी सर्वांना एकत्र येऊन जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच सायंकाळी सात वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमा व पुतळा यांची गावांमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर
