श्रमजीवीचा पोशेरा ग्रामपंचायतीवर आदिवासींचा आधारकार्डासाठी विराट मोर्चा प्रतिनिधी राजू पागी जव्हार*
दि २८ /०५ २०२६ सुमारे २०० हुन अधिक आदिवासी नागरिक आधारविना. संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव, अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
काही वर्षांतील विकासकामांचा हिशोब छायाचित्रांसह देण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी सर्वात धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील शून्य ते १७ वर्षे वयोगटातील तसेच १८ वर्षांवरील मिळून तब्बल २०० हून अधिक आदिवासी नागरिक अद्याप आधार कार्डापासून वंचित असल्याची. शासनाच्या मूलभूत योजनांपासून हे नागरिक केवळ कागदपत्राअभावी वंचित राहत असल्याचा गंभीर मुद्दा आंदोलनकर्त्यांनी मांडला.
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, तरी आम्हाला साधे आधार कार्डही मिळू नये का.?.असा संतप्त सवाल करत मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी कातकरी बांधवांचा विराट मोर्चा धडकला. भीषण उन्हाची तमा न बाळगता हातात संघटनेचे झेंडे घेऊन शेकडो महिला-पुरुष रस्त्यावर उतरल्याने परिसरात आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, अनेक माता आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन तासन्तास उन्हात उभ्या होत्या. या विदारक चित्रामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. तब्बल तीन तास जबाबदार अधिकारी जागेवर उपस्थित नसल्याने आंदोलन अधिक आक्रमक बनले होते.
या आंदोलनात केवळ आधार कार्डच नव्हे तर गावातील गंभीर पाणीटंचाई, ‘जल जीवन मिशन’ नळ योजनेची सद्यस्थिती, रोजगार हमी योजनेतील कामे आणि गेल्या
श्रमजीवी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. ग्रामसेवक मंगेश पाटील आणि स्थानिक सरपंच यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत तातडीची बैठक घेत सकारात्मक चर्चा केली. यामध्ये वंचित २००हुन अधिक नागरिकांना लवकरात लवकर आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे तसेच गावातील पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न केल्यास याहून तीव्र संघर्ष छेडला जाईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघुनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे, तालुका सहसचिव रामदास वाघ, माजी तालुकाध्यक्ष पांडू मालक, संदीप पागारी यांच्यासह अनिल वाघ, विनोद वळवी, गोकुळा वळवी आणि शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
