दोडी ते कणकोरी शालेय बस वेळेवर सुरु पत्रकार सुरेश सांगळे यांच्या पर्यंतनाला यश सिन्नर (कणकोरी). सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात दोडी बुद्रुक येथे शिक्षणासाठी जातात कणकोरी ते दोडी शालेय बस महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून सुरू आहे परंतु ती बस कधी यायची तर कधी येत नव्हती परंतु दक्ष पोलीस वार्ता न्यूज चे सिन्नर ग्रामीणचे पत्रकार सुरेश सांगळे यांनी सिन्नर बस डेपो येथे दि.१५/०६/२६ रोजी निवेदन दिले होते त्यामुळे बस सुरळीत चालू झाले आहे तसेच बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी संगमनेर येथे ये जा करत असतात त्यामुळे लासलगाव ते संगमनेर धावणारी बस कणकोरी गावातून येण्यासाठी पत्रकार सांगळे यांनी निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेत दि.१८ /०६/२६ पासून लासलगाव वरून येणारी बस कणकोरी गावातून सुरू झाली आहे. पत्रकार सांगळे हे नेहमीच समाजसेवेमध्ये चर्चेत असतात त्यांच्या या समाजसेवेमुळे ते आणखी चर्चेत आले आहे त्यांच्या या कामामुळे कणकोरी गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
