कणकोरी येथील रहिवासी माजी पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांच्या घरी धाडसी चोरी. सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे शुक्रवार दिनांक 09/05/2026 रोजी कणकोरी पाटी ते कणकोरी गाव या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोपट काशिनाथ सांगळे. माजी पोलीस उपनिरीक्षक मुंबई.सध्या कणकोरी येथे वास्तव्यास असलेल्या घरामध्ये धाडसी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.सांगळे हे काही कामानिमित्त मुंबईला गेलेले असल्यामुळे कणकोरी येथील घर बंद होते.याचाच फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी पहाटे अंदाजे तीन ते चारच्या दरम्यान घराचा सेफ्टी दरवाजा कटरच्या साह्याने कापून आत मध्ये प्रवेश केला व घरातील कपाट लोखंडी हत्याराच्या साह्याने तोडण्यात आले व सांगळे यांच्या सांगण्यावरून एक लाख दोन हजार रोकड रक्कम व बारा ग्रॅम सोन्याची चैन चोरी गेल्याचे सांगितले. तसेच या घटनेची खबर मिळताच गावातील पोलीस पाटील सुनीता विनायक बुचकूल या घटनास्थळी हजर झाल्या व त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला कळवले वावी पोलीस स्टेशनला बातमी समजतात तेथील पीएसआय सरवर साहेब व एपीआय गणेश शिंदे साहेब तात्काळ घटनास्थळी हजर झाले तसेच पंचनाम्यासाठी कणकोरी गावच्या सरपंच योगिता रामनाथ सांगळे व ग्राम पंचायत अधिकारी श्री योगेश सोनवणे तसेच पाणीपुरवठा कर्मचारी रोहित बुचकूल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी.श्री सुरेश सांगळे दक्ष पोलीस वार्ता न्यूज सिन्नर ग्रामीण .
