रमिन काद्री/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता, निफाड

आज दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी एस पी ऑफीस नाशिक येथे शालेय परिवहन समिती या संदर्भात मीटिंग घेण्यात आली. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांवरील वाढणारे अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान बालकांवरील अत्याचार, बालकामगार, शालेय विद्यार्थ्यांवरील अत्याचार या आणि यासारख्या अनेक प्रश्नांना तोंड देण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे शालेय परिवहन समितीने एस पी ऑफिस नाशिक येथे मीटिंग घेतली.

मिटिंग मध्ये मुख्य अतिथी म्हणून नाशिक ग्रामीण एसपी विभागाचे प्रमुख म्हणून श्री सचिन पाटील सर यांनी मार्गदर्शन केले.
मिटिंगमध्ये पुढील प्रमाणे मुद्दे मांडले गेले :-
1)शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी ही संपूर्णपणे मुख्याध्यापक/प्राचार्य यांची असेल मग तो विद्यार्थी पायी,सायकल, किंवा स्वतःच्या वाहनाने येत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची/ प्राचार्यांचे असेल.
2) शालेय समिती मध्ये स्थानिक प्रतिनिधी तसेच आरटीओ किंवा पोलिस प्रतिनिधी बस चालक प्रतिनिधी यांचा समावेश महत्त्वाचा ठरणार आहे.
3)बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद झालेली असावी त्यासाठी शासन स्तरावर वेबसाईट तयार करण्याचे काम चालू आहे व ते लवकरच पूर्ण होईल आणि त्यामध्ये शाळेची सर्व माहिती त्या वेबसाईट वरती नोंदवण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांचे सर्व डिटेल्स भरण्यात येतील.
4) शालेय परिवहन समिती मुळे मुलांच्या सुरक्षित नक्कीच वाढ होणार आहे आणि ते श्री पाटील सर यांनी व्यवस्थितपणे समजावून सांगितले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

