सुनील खुताडे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दाभोसा, ता.जव्हार जि.पालघर येथे आज दि. १५.०८.२०२३ रोजी स्वातंत्र्य दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत कार्यालय दाभोसा येथे विविध देशभक्तीपर घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेतील ध्वजारोहण मान. श्रीम. योगिता माडी, सरपंच ग्रामपंचायत दाभोसा यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानी बद्दल वकृत्व सादर केले. तसेच विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य व मानवी मनोरे सादर करून देशभक्ती बद्दल छानसा संदेश दिला. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वाटप करण्यात आले व स्वातंत्र्य दिनानिमित बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. सरपंच श्रीम. योगिता माडी, श्री. नंदकिशोर पवार माध्य. मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दाभोसा, श्री. सुनील खुताडे, पोलीस पाटील श्री. विष्णू वळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. येशू खुताडे, उपाध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश मजगे प्राथ. शिक्षक यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता शाळेतील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

