जुल्फेखार शेख/प्रतिनिधी- दक्ष पोलीस वार्ता
11/08/2023 रोजी डी वाय एस पी संदीप मिटके यांना कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि विजय मवाळ या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . या कारवाईमुळे कोपरगाव शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर Ad sp यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रदीप देशमुख, HC इरफान शेख,PN कुऱ्हे,PN शिंदे, PC दिनेश कांबळे ,HC आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

