आनंद बंसल / प्रतिनिधि – दक्ष पोलीस वार्ता , पुणे
जळगाव-औरंगाबाद रोडवरील एमआयडीसी परिसरात रात्री १० वाजेच्या सुमारास दोन गटात आपापसात भांडण सुरू होते. सदर घटनेचा रिपोर्ट मिलताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यांनी तत्परतने घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही गटातील भांडण सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न ही केला त्यांचे है प्रयत्न सुरु असताना अचानक दोन्ही गटातील ८ ते १० जणांनी पोलीसांच्या दिशेनेही तुफान दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, दिपक सोनवणे हे जखमी झाले. शिवाय दुचाकीच्या काचा देखील फोडल्या गेल्या.
या घटनेप्रकरणी रविवारी २ जुलै रोजी पहाटे ४ वाजता पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तुषार उर्फ धडकन कोळी, कृष्णा भालेराव यांच्यासह दोन्ही गटातील अनोळखी १८ ते २० जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व आता पुढील गुन्हे तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

