आनंद बन्सल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे

पुण्यातील गंगाधाम चौकात सिग्नल का तोडला असे विचारले असता एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याची घटना घडली होती.
पुण्यातील गंगाधाम चौकात सिग्नल का तोडला असे विचारले असता एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने दुचाकीस्वार तरुणाला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात एका साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अल पेरामपल्ली यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
गफूर शहाबुद्दीन शेख वय 27 रा. गुलटेकडी असे दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई आनंद प्रकाश गड्डुरे यांनी तरुणाविरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना 19 मार्च 2014 रोजी सकाळी 10/30 ते 10/45 या वेळेत गंगाधाम चौकात घडली होती. त्यावेळी तक्रारदार पुणे वाहतूक पोलिसांच्या स्वारगेट शाखेत हवालदार म्हणून कार्यरत होते
घटनेच्या दिवशी पोलीस हवालदार आनंद गड्डुरे गंगाधाम चौकात वाहतूक व्यवस्था सांभाळत होते. यावेळी आरोपी तरुणाने दोनदा सिग्नल तोडला. यावेळी सिग्नल का तोडला? अशी हवालदार गड्डुरे यांनी तरुणाला विचारणा केली. मात्र, तरुणाने हवालदाराला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत गणवेश फाडला. तरुण आणि हवालदाराची हाणामारी पाहताच चेतन भुतडा या साक्षीदाराने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
या प्रकरणी तरुणावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. हा खटला न्यायालयात गेल्यानंतर तेन भुतडा यांनी हवालदार गंड्डुरे यांच्या बाजूने साक्ष दिली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपीला दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने म्हटले की, आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. त्याला शिक्षा करणे हा एकमेव पर्याय आहे. यामुळे लोकांना सिग्नल पाळण्याच्या सवयी लागतील.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

