हरिश शिंदे किनीस्ते / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून खोडाळा परिसरातील जनतेने आक्रोश मांडला आहे कारण जर खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली तर खोडाळा परिसरातील रुग्णांना होणारा त्रास व परिणामी गमवावा लागणारा आपला जीव हा वेळेत मिळणाऱ्या उपचारामुळे थांबणार आहे गेल्या चार वर्षांपासून खोडाळा ग्रामीण रुग्णालय मंजुरीची फाईल मंत्रालयात पडून आहे या फाईलला गती मिळावी म्हणून अनेक खोडाळा वासीयांचे प्रयत्न देखील चालू आहेत पण फाईल काही वेग घेत नाही आणी म्हणूनच या संदर्भात वारंवार वृत्तपत्रांमधून बातम्या देखील छापून आल्या पण खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला गती मिळेना आणी म्हणूनच जर खोडाळा ग्रामीण रुग्णालय मंजुरी फाईलला जर गती मिळणार नसेल तर आम्ही खोडाळा परिसरातील जनता आंदोलनाची भूमिका घेऊ असे खोडाळा विभागातील जनतेने आपले मत नोंदवले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

