सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर

ठाणे जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्यातील अजनुप जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थीनी व विद्यार्थी दोन्ही संघांनी खो खो स्पर्धेत बाजी मारली आहे. मुलांच्या या कामगिरी मुळे अजनूप परिसरात आनंदाची लाट पसरली आहे. आज दिनांक 1/3/2023 रोजी ग्रामस्थांनी शाळेतून कोळीपाडयापर्यंत ट्रॅक्टरवर खेळाडूंची मिरवणूक काढली. मुलींच्या संघाची कर्णधार कु. कार्तिकी घरत व मुलांचा कर्णधार कु. अक्षय मडके यांनी संघांचे नेतृत्व केले. गावात देखील ठिकठिकाणी खेळाडूंना ओवाळण्यात आले. खो खो प्रशिक्षक श्री. महादू मेंगाळ, अजनूप शाळेतील शिक्षकवृंद श्री. भरत कोदे, श्री. शरद जाधव, श्री. दिगंबर पवार, सौ. शोभा महाजन, सौ.अस्मिता तारमळे, तसेच मिरवणुकीत प्रोत्साहन देणारे व शाळेला, मुलांना सर्वेतोपरी मदत करणारे श्री. योगेश झारघडे, सौ. योगिनी झारघडे शाळेच्या कोणत्याही कामासाठी अगदी तत्परतेने तन – मन – धनाने मदत करणारे श्री.संजय भोईर दादा आणि व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. जोत्स्ना चव्हाण, तसेच माता पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी मिरवणुकीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. शाळेच्यावतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रम समारोप करण्यात आला.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

