इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता न्यूज , नाशिक

नाशिक जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडलीय. वॉर्ड मधील साफसफाई करण्यासाठी रुग्णालयाच्या परिचारिकेने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर काढले होते. त्याचबरोबर रुग्णाला एका ठिकाणी बसण्यास सांगितल्याचा राग आल्याने रुग्णानी परिचारिकेला आणि साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केलीय. यात कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे जिल्हा रुग्णालयात काम करणे शक्य नसल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आलीय. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

