सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नाशिक जिल्यातील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अति प्राचीन असल्याने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिर देखभालीच्या कामासाठी सदर मंदिर दि.५ जानेवारी २०२३ ते दि.१२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही.

सदर संवर्धनाचे काम हे भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी व हितचिंतकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मा. चेअरमन साहेब व मा. विश्वस्त मंडळाने केले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

