मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , मोखाडा

शहरात प्रथमच विविध सुविधांसह आर ए एम फिटनेस क्लब चे उदघाट्न मोखाडा नगरपंचायतींचे नगरध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवसु दिघा उप नगराध्यक्ष प्रमोद कोठेकर वैशाली महेंद्र धुम नगरसेविका. पत्रकार मकरंद बात्रे. राजेश खरडीकर हानिफ शेख युवा नेते रोहित चक्रवर्ती युवा उद्योजक साईराज पाटील.फिटनेस क्लब चे संचालक अविनाश महाले त्यांच्या मातोश्री चंद्रभागा महाले व पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.

चांगल्या प्रकारे शरीर संपदा कमवा स्वताच्या आरोग्य साठी उतम व्यायम करा. कुणाला खुणस म्हणून येथे न येता प्रथमच आपल्या शहरात अशा सर्व सुविधा संपन्न जिम क्लब आपल्या सेवेत आल्याने त्याचा योग्य असा वापर युवकांनी करावा असे आवाहन अमोल पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

