खलील शेख/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,पिंपळगाव बसवंत

निफाड तालुक्यातील मिरची पालखेड येथील आदिवासी शक्ती सेना यांच्या तर्फे मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)यांना मा.ऍड.श्री.वैद्यनाथ वाघमारे आडसकर समन्वपक महाराष्ट्र प्रदेश यांना असे निवेदन देण्यात आले कि आदीवासी आरक्षणास धनगर समाजाचा समावेश करू नये कारण आम्ही ग्रामीण भागातील आदिवासी बांधव मौजे-पालखेड पत्राद्दारे विनंती करून सांगण्यात आले. कि आदिवासी समाजाच्या आरक्षनाला धक्का न लावता धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तसेच मूळ आदीवासी आरक्षणाचा त्यांच्यात समावेश करू नये असे पत्राद्दारे नमूद केले व मा.ऍडव्होकेट वैद्यनाथ वाघमारे सर यांना निवेदन देण्यात आले…
निवेदन देण्यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे कैलास सूर्यवंशी, निफाड तालुका अध्यक्ष आकाश कराटे, निफाड तालुका युवा उपाध्यक्ष बसपा महासचिव निफाड तालुका प्रमोद सासवडे, रवींद्र भोगे, सचिव बसपा पालखेड शहराचे बारा बलुतेदार अध्यक्ष सोमनाथ खैरनार, ज्ञानेश्वर थेटे ,विष्णू कराटे ,बसपा नेते मनोज लोढा, नाना भोगे ,सनी कोकाटे ,बाळा गांगुर्डे ,एकनाथ गांगुर्डे ,श्याम कोकाटे, सागर कोकाटे ,गोरख कोकाटे व सर्व आदिवासी बांधव पालखी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

