रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, पिंपळगाव बसवंत

लासलगाव आगारातून शालेय विद्यार्थ्यांसाठी लासलगाव वनसगाव फेरा सकाळी ७:०० वाजता सुरू होते. शालेय विद्यार्थी यांची संख्या जास्त असल्याने कोटमगाव मध्ये बस आल्यानंतर बस थांबत नव्हती विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कॉलेज हायस्कूल क्लासेस यांचे टाइमिंग चे बंधन असल्यामुळे वेळेत जाता येत नव्हते.
ठीक-ठिकाणी विद्यार्थी उभे राहून ट्रॅक्टर मोटरसायकल मिळेल. त्या वाहनाने विद्यार्थी प्रवास करत होते ही बाब प्रहार युवा आघाडी निफाड तालुका अध्यक्ष श्री. दिपक कांतीलाल शिंदे तसेच ग्रामस्थांच्या लक्षात येताच. दिनांक १५-९-२०२३ रोजी मा. आगर व्यवस्थापक लासलगाव ता. निफाड आगार प्रमुख मा. काळे मॅडम यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. आगार प्रमुख यांनी तात्काळ दखल घेऊन बस सेवा ही गणपती विसर्जन झाल्यानंतर सुरू करण्याच्या आश्वासन दिले. त्यानुसार बस सेवा ही कोटमगाव साठी सकाळी ७:००वाजता सुरू करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी 46 गाव तालुकाध्यक्ष श्री दिपक कांतीलाल शिंदे कोटमगाव ग्रामपंचायत उपसरपंच श्री. योगेश पवार ग्रामपंचायत सदस्य श्री. हरीश कडाळे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. भाऊसाहेब पवार प्रतिष्ठित व्यक्ती गुरगुडे काका, सामाजिक कार्यकर्ते श्री .शंकराव मोरे कमलेश मोरे यांनी वाहन चालक वाहक यांचे शाल श्रीफळ देऊन आभार मानले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

