दानिश शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा शहरात विविध ठिकाणी सुरू असलेले विकासकामे यांच्या अनुषंगाने आज 2 नोव्हेंबर रोजी रोजी पाहणी दौरा झाला. मिरची चौकासह सिद्धिविनायक चौक, नांदूर नाका चौक, तारवाला सिग्नल, जेल रोड, पेठ रोड, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉलजवळील संभाजी चौक, पश्चिम विभागातील एचडीएफसी चौक आदी चौकांची पाहणी करुन सुधारणाबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांच्या बरोबर शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त करुणा डहाळे, नगर नियोजन विभागातील कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल उपस्थित होते.
मिर्ची चौक
दुर्घटना घडलेल्या मिरची चौकात मनपामार्फत केलेली कामे आणि अजून आवश्यक उपाययोजना या अऩुषंगाने पाहणी केली. चौकात गतिरोधक टाकण्यात आले आहेत. प्लास्टिक पेंट करण्यात आलेला आहे. सायनेजिस देखील लावण्यात आलेले आहेत. अतिक्रमण काढून झालेल्या ठिकाणी रस्त्याचे ड्रेसिंग करून त्या ठिकाणी दृश्यमानता वाढविण्याच्या दृष्टीने प्लॅनिंग क्लिअर करणे, नगर नियोजन विभागामार्फत रस्त्याचे डिमार्केशन करणे, दुभाजक टाकणे, कॅट आईज सायलेजेस बसविणे. त्याचप्रमाणे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यात्यारीत असलेल्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने त्यांना अवगत करणे अशी सूचना केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रस्त्यावर देखील वारंवार अतिक्रमण विभागामार्फत पाहणी करून हॉकर्स, हातगाड्या हटवण्याचा आदेश दिला.

सिद्धिविनायक चौक
औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक चौक या ठिकाणीही त्यांनी पाहणी केली. रस्त्याचे डीमार्केशन करणे, फॅनिंगचे डीमार्केशन करणे त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांना नोटीसा देऊन अतिक्रमण तातडीने काढून घेण्याची कार्यवाही करण्याचा आदेश दिला. मिरची चौकाच्या धर्तीवर या चौकातही सुधारणा करण्याचे आदेश दिले.
नांदूर नाका
नांदूर नाका चौक या ठिकाणी पाहणी केल्यानंतर सदर ठिकाण जंक्शन हे स्टॅगर्ड जंक्शन प्रकारातील असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. चौक मोकळा करण्याच्या दृष्टीने मनपाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्राचे डीमार्केशन करणे, अतिक्रमण धारक व अनधिकृत बांधकामबाबत नोटिसा देणे आदेशित केले.

जेल रोड
जेलरोड इंगळे नगर येथील रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करणे, पेंट करणे सायनेजेस टाकणे, थर्मोप्लास्टिक पेंट करणे आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी गतीविषयक बसविणे याबाबत आदेशित केले.
तारवाला सिग्नल
पंचवटी विभागातील तारवाला सिग्नलची पाहणी केली. पोर्टलची तातडीने दुरुस्ती करणे. गतिरोधकावर प्लास्टिक पेंट मारणे, कॅटेज लावणे आणि लोकांना दिसतील अशा पद्धतीचे सायनेजेस लावणे, चौकाची दृश्यमानता वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशित केले.
पेठ रोड
पेठ रोडवरील रस्त्याचीही पाहणी केली. आरटीओ चौकातील अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने मनपाच्या ताब्यात आलेले क्षेत्रफळाचे डिमार्केशन करणे, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा देणे, गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे थर्मोप्लास्टिक पेंट करणे अशा सूचना केल्या. पेठ रोडवरील एपीएमसी चौक ते कॅनॉल रस्ता दुरुस्ती पाहणी केली. गुणवत्तापूर्ण काम करण्याची सूचना केली. त्या ठिकाणांनंतर चोपडा लॉन्स ते गंगापूर नाका हा रस्ता स्मार्ट सिटी मार्फत विकसित करण्याच्या दृष्टीने आदेशित केले.
संभाजी चौक, एचडीएफसी चौक
पश्चिम विभागातील सिटी सेंटर मॉल जवळील संभाजी चौक या ठिकाणी पाहणी केली. अतिक्रमणे हटवून चौकातील दृश्यमानता वाढविण्याच्या दृष्टीने सुचना केल्या.
याच विभागातील एचडीएफसी चौक या ठिकाणी पाहणी केली. चौकाचे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे, दृश्यमान्यता वाढविण्याचे दृष्टीने झाडांचा विस्तार कमी करणे, स्पीडब्रेकर टाकणे व थर्मोप्लास्टिक पेंट मारणे अशा स्वरूपाची कामे तातडीने करण्याचे आदेशीत केले.
त्रिमूर्ती चौक
नवीन नाशिक विभागातील त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना नगर नियोजन विभाग आणि आतिक्रमण विभागाला केली. चौकाची दृश्यमानता वाढविण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सायनेजेस बसविणे, आवश्यकतेनुसार स्पीड लिमिटच्या दृष्टीने गतिरोधक टाकण्याची सूचना केली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

