जाहिद शेख / उपसंपादक, दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा ‘जागतिक स्तन कर्करोग जनजागृती’ महिना म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील रेकार्ड हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. डॉ. कल्पना कुटे यांनी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे, उपाय, मासिक पाळीतील काळजी याबाबत माहिती दिली. अशोक आत्राम यांच्या प्रयत्नांमुळे यासंबंधीची तपासणी महिला कर्मचाऱ्यांना अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आली.
याप्रसंगी एचसीजी मानवता आणि वॉव ऑर्गनायझेशन (डब्लूओडब्लू) यांच्या वतीने उपस्थितांना कर्करोग तपासणीचे कुपन्स देण्यात आले.

‘पिंक मेळा’ची माहिती
या संघटनांच्या वतीने येत्या शनिवारी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत ‘पिंक मेळा’ आयोजित करण्यात आला आहे. याबाबतही माहिती देण्यात आली. लाइव्ह बँड, सापशिडी, रिंग गेम्स, फ्लि मार्केट, प्रश्न-उत्तर असे विविध उपक्रम मेळाव्यात पार पडणार आहेत. सगळ्यांना एक गिफ्ट दिले जाणार आहे. मेळाव्यानिमित्त ‘ऑनलाइन रांगोळी स्पर्धा’, ‘सेल्फी इन पिंक’ असे उपक्रमही होणार आहेत. ‘सेल्फी इन पिंक’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपला फोटो किंवा आपल्या मुलीसह, मैत्रिणीसह फोटो काढून पाठवायचा आहे. फोटोसोबत कर्करोग जनजागृती विषयी घोषवाक्य लिहून पाठवायचे आहे. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

