राजेंद्र कोल्हे /प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

होम लोन देणारी कंपनी असलेल्या HDFC लिमिटेडकडून आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI कडून रेपो दरात ५० बेस पॉइंट्सने (५.९%) वाढ करण्यात आल्यानंतर HDFC Ltd ने देखील शुक्रवारी आपल्या होम लोन वरील दरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली. हे लक्षात घ्या कि, गेल्या ५ महिन्यांत HDFC कडून एकूण ७ वेळा दर वाढवण्यात आले आहेत.या दर वाढीमुळे आता एचडीएफसीकडून होम लोन घेतलेल्यांच्या ईएमआयमध्येही वाढ होईल. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर आता इतर वित्तीय संस्था आणि बँका देखील आपल्या दरात दर वाढ करू शकतात.
१ ऑक्टोबर २०२२ पासून नवीन दर लागू होतील एका निवेदन जरी करत कंपनीने म्हटले की, “HDFC ने होम लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) ५० बेस पॉइंट्सने वाढवले आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२२ पासून ही दरवाढ लागू होणार आहे.
RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट ०.५ टक्क्यांनी वाढवून ५.९ टक्के केला. हा गेल्या ३ वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919175261809 / +919175268809

