सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

अनैतिक संबंधातून हत्येच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. याप्रकाराशी संबंधित एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. पत्नीने आपल्याच डॉक्टर पतीला अनैतिक संबंधातून आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन टोचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयातीलच एका खोलीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रविवारी ही धक्कादायक उघडकीस आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
नाशिक येथील एका खासगी रुग्णालयातील 45 वर्षीय पीडित डॉक्टरला त्याच्या ४० वर्षीय पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून संगनमताने रुग्णालयात बोलावले आणि याठिकाणी वाद घातला. यानंतर डॉक्टरला दोघांनी मिळून रुग्णालयातीलच एका खोलीत डांबले.
आणि तेथे त्यांना इंजेक्शनद्वारे भुलीच्या औषध देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. म्हसरुळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते आणि याबाबतची कुणकुण तिच्या डॉक्टर पतीला लागली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
यातूनच या महिलेने आपल्या जोडीदाराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन दिले, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी दोघा संशयितांपैकी कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नव्हते. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक निरिक्षक अहिरे हे करीत आहेत. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

