जोहरान पठाण / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावं जाहीर केली आहेत. अनेक दिवसांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत अशी टीका केली जात होती. आता मात्र या प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरुन सरकारवर जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
पाहा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?
राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील : पुणे,
विजयकुमार गावित : नंदुरबार,
गिरीश महाजन : धुळे, लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील : बुलढाणा,
दादा भुसे : नाशिक,
संजय राठोड : यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे : सांगली,
संदिपान भुमरे : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर),
उदय सामंत : रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत : परभणी, उस्मानाबाद (धाराशिव),
रवींद्र चव्हाण : पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार : हिंगोली,
दीपक केसरकर : मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे : जालना, बीड,
शंभूराज देसाई : सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा : मुंबई उपनगर.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

