प्रभाकर सेलकनंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पालघर

आरोपी भरत शरद जगदाळे ,पोलीस नाईक 922, नेमणूक पडघा पोलीस ठाणे. हस्तगत रक्कम 20,000/-रुपये लाचेची मागणी ता. 21/09/2022 ते 22/09/2022 रोजी लाच स्विकारली ता. 22/09/2022 रोजी 02.35 वा.
यातील तक्रारदार हे चालक म्हणून काम करतात. त्यांचे ताब्यातील वाहनावर कारवाई न करण्यासाठी व त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत चालु ठेवण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे30,000/- रुपये लाच स्वरूपात मासिक हप्त्याची मागणी करून तडजोडीअंती 20,000/- रुपये लाच रक्कम तळवली नाका पोलीस चौकी येथे पंचांसमक्ष स्वीकारली असून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कारवाई चालु आहे.
सापळा पथक
पोलीस निरीक्षक संतोष अंबिके , पोना /विनायक जगताप , पोना/नवनीत सानप,मपोना जाधव, चालक स.पो.उ.नि /बर्गे .
मार्गदर्शन अधिकारी
1. मा.श्री.पंजाबराव उगले, अपर पोलिस आयुक्त, ठाणे तथा पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र( अतिरिक्त कार्यभार)
२.श्री अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी मा.पोलीस अधीक्षक ,जिल्हा – ठाणे ग्रामीण
ठाणे जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ठाणे कार्यालय फोन नं. 022- 20813598/99
टोल फ्री:- 1064
चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू(सदरचा मेसेज आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये प्रसारित करावा ही विनंती)
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

