सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५० रा, मोरवाडी ) असे संशयीत आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. उल्हास कुटे हे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिका डॉक्टरने बोलावले. ती रूम मध्ये एकटी असल्याचे निमित्त साधून हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूमच्या आत प्रवेश करीत दरवाजाची कडी लावून डॉक्टर कुटे यांनी पीडित परिचारिकेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध केले. यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला काढून टाकण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात भा.द.वी. कलम ३७६, ५०४, बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ हे करीत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

