सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज ,नाशिक

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा राज्यभरात गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. इच्छित मनोकामना पूर्ण करणा-या विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त आज निरोप देण्यात आला. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नैसर्गिक नद्या, विसर्जन घाट, कृत्रिम तलाव या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून पारंपरिक मिरवणुकीने ढोलताशांच्या गजरात भक्तगणांच्या अलोट गर्दीकडून लाडक्या गणपती बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या निनादात निरोप देण्यात आला.

गणेश भक्तांनी घरगुती गणेशाचे भक्तीमय वातावरण विसर्जन केले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

कोरोना विषाणू संक्रमणानंतर यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात श्रींचा उत्सव साजरा झाला. ‘रिकामं झालं घर…रिता झाला मखर…पुढल्यावर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर’, ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात बाप्पांला आबालवृध्द भाविकांनी श्रध्देचा निरोप दिला.

गणेश विजर्सनासाठी तगडा बंदोबस्त
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांना विसर्जनस्थळी पाचारण करण्यात आले आहे. काल पोलीस प्रशासनाच्या मदतीने विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

