रमिन कादरी/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,येवला

बाभुळगाव, ता. येवला येथील संतोष श्रमिक जुनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी येथील कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत, स्वतः शिक्षकांचा रोल केला.

शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थी शिक्षकांनी प्रार्थना, तासिकांचे नियोजन, विद्यार्थी शिस्त, शालेय परीसरात साफ सफाई, आणि कार्यक्रम घेऊन शेवटी शिक्षक दिनाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्यू. कॉलेज विभाग प्रमुख पैठणकर सर होते यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचे मनोगतात खैरे सर यांनी शिक्षकांविषयी असलेले प्रेम, खऱ्या शिक्षकाचे कार्य, शिक्षकाचे महत्त्व, मानवी जीवनातील शिक्षकांचे स्थान इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना पटवून सांगितल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी विभाग प्रमुख किरण पैठणकर सर, मनोहर खैरे सर, रावसाहेब मोहन सर, गोल्हाईत सर, नवनाथ जाधव सर, किरण गायकवाड सर, अनर्थे सर, समाधान गायकवाड सर, देठे सर,अरुण जाधव सर, देवडे सर, कादरी सर, बाकळे सर, अरोरा सर, शाह सर, भड सर, फारुकी मॅडम, वाबळे मॅडम, बोजगे मॅडम, जाधव मॅडम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणाने झाला.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

