गणेश बत्तासे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , कोपरगांव

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरातील 6 विद्यार्थिनी NMMS परीक्षा 2021-22 मधे शिष्यवृत्तीस पात्र.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत 2021-2022 मध्ये इयत्ता आठवीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील प्रग्यावान विद्यार्थ्यांना उच्चमाध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी,शिक्षणातील गळती रोखावी यासाठी घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.परीक्षेची शिष्यवृत्तीधारक अंतीम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
या परीक्षेत विद्यालयातील 49 विद्यार्थिनी उत्तीर्ण व 6 विद्यार्थिनी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या आहेत.
1) कु. हळनोर प्रांजल रमेश (NT-C110)
2) कु. आभाळे समृद्धी आबासाहेब
(OBC -102)
3)कु. माकुणे प्रेरणा उमेश
(GEN -120)
4)कु. पानगव्हाणे पायल दत्तात्रय
(GEN -125)
5)कु. कोळपे आरती काशिनाथ
(NT-C-102)
6)कु. खोतकर नंदिनी विजय
( SC-89)
या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींना इयत्ता नववी पासून बारावी पर्यंत दरवर्षी प्रत्येक विद्यार्थिनीला 12000/_ रूपये याप्रमाणे चार वर्षासाठी एकूण 48000/_ रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थिनी,मार्गदर्शक शिक्षक- विभाग प्रमुख -राऊत संजय, बारगळ नितीन, श्री. रणविरकर राजेश,चौधरी राजेंद्र, वसावे सुमन व आठवी इयत्तेस अध्यापन करणारे सर्व शिक्षक या सर्वांचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आदरणीय ना.आशूतोषदादा काळे साहेब,मा.आ.अशोकराव शंकरराव काळे,विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी वाळुंजकर काकासाहेब व शिवाजीराव तापकीर साहेब , स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्षा मा.सौ.पुष्पाताई अशोकराव काळे व सदस्य, अध्यक्ष व सदस्य – व्यवस्थापन समिती,व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक- पालक संघ,मुख्याध्यापिका काकडे छाया, उपमुख्याध्यापक गोडे मधुकर, पर्यवेक्षक खंडिझोड सुरेश, सर्व सेवकवृंद, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

