मा आयुक्त.सा.उप आयुक्त.सा नासिक मनपा मतदान यादी दुबार नावे BLO मार्फत पडताळणी करा ऊ ब ठा शिवसेना तर्फे मागणी. प्रतिनिधी वसीम पठाण नासिक. दि २४.११.२०२५ मा आयुक्त नाशिक मा.उपायुक्त नाशिक महानगरपालिका
नाशिक शहरातील प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील प्रचंड दुबार व मयत नावे, प्रभागबदल, आणि हेतूपुरस्कर गोंधळाबाबत तातडीने कारवाई करण्याबाबत निवेदन
महोदय,
सदर निवेदनाद्वारे आम्ही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे, नाशिक शहरातील २०२५ च्या महापालिका निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत गंभीर व संरचनात्मक हरकत नोंदवू इच्छितो.
दुभार.डुप्लिकेट नावांचा अत्यंत गंभीर निष्कर्ष असे कीनाशिक महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार.८६६८८ दुबार नावे आढळल्याचे नमूद केले आहे.
परंतु, यापूर्वी आम्ही राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र , नाशिक जिल्हा निवडणूक अधिकारी. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनानुसार, फक्त नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्येच दुबार नावांची संख्या एकूण ३. ५३,000 पेक्षा अधिक आहे.
उदाहरणार्थ:
नाशिक पूर्व मतदारसंघात• नाशिक पश्चिम.१३. ०८८ नावे• नाशिक मध्य.९६४१ नावे• नाशिक देवळाली. ८५२८नावे
एकूण.३१. २५७ नावे केवळ शहरी भागातील आणि असेच नाशिक महानगरपालिकेच्या तिन्ही मतदारसंघात अशा नावांची भरमसाठ केलेली आहे ही नावे एकमेकांच्या मतदारसंघात स्थानांतरित केल्याने नाशिक जिल्ह्यातील इतर मतदारसंघात मधूनही दुबार नावे नाशिकच्या चारी मतदारसंघात टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे हेतूपुरस्कर फेरफार केले असल्याचा स्पष्ट संशय निर्माण होतो.
अर्थात, तुम्ही केलेला तपास फक्त २५ % दुबार नावांपर्यंत पोहोचला आहे अजून ७५ % नावे यादीत दुबार स्वरूपात अस्तित्वात आहेत.म्हणजेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह.
तसेच मयत व्यक्तींची नावे मतदार यादीत १९९२ पासून मृत झालेल्या हजारो नागरिकांची नावे आजही प्रारूप मतदार यादीत आहेत. प्रत्येक प्रभागात ३००/ ४०० मयत नावे आणि काही प्रभागात १०००/ पेक्षा जास्त नावे आढळली आहेत. मृत्यू नोंदणी हा महापालिकेचा विभाग असून, जन्म–मृत्यू कार्यालयाकडे याची संपूर्ण नोंद आहे.
मग मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना यादीतून नाव काढण्यासाठी महापालिकेकडे धाव का करावी.
याची जबाबदारी मतदारावर ढकलणे हे अमान्य आहे.
मयत नावे तात्काळ स्वतःहून काढावीत, BLO यंत्रणेचा वापर करावा. ही आमची अत्यंत ठाम मागणी.
प्रभागांमध्ये मतदारांचे हेतूपूर्वक स्थलांतर नवीन प्रभाग रचनेनंतर, अनेक प्रभागांतील नावे संपूर्णपणे इतर प्रभागांत जाणीवपूर्वक स्थलांतरित करण्यात आलेली आहेत, ज्यामुळे निवडणूक परिणामावर प्रभाव पडण्याचा संशय निर्माण होतो.
उदाहरणार्थ. काही प्रभागांतील मोठ्या प्रमाणात नावे शेजारच्या प्रभागांत स्थानांतरित करण्यात आलेली आहेत, ज्यामुळे लोकांचा विश्वास हादरला आहे. हरकतींसाठी दिलेल्या ७ दिवसांची मुदत अत्यल्प व अन्यायकारक
मतदारांना, BLO ना, राजकीय पक्षांना यादीचे इतके मोठे परीक्षण करण्यासाठी दिलेली फक्त ७ दिवसांची मुदत हास्यास्पद आहे.
त्यात पुरावे, अर्ज, माहिती जोडण्याची जबाबदारी नागरिकांवर टाकण्यात आली आहे. हा मतदारांना त्रास देण्याचा हेतूपुरस्कर प्रयत्न आहे.
पारदर्शक निर्णय प्रक्रिया आवश्यक.प्रारूप यादीवरील हरकत निकाली काढल्याचे प्रत्येक निवडणूक कार्यालयात अधिकृत सूचना लावावी
हरकत स्वीकारली नाकारली याची तपशीलवार सार्वजनिक माहितीपत्रिका प्रसिद्ध करावी
अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन पूर्ण पारदर्शकता राखावी
आमच्या ठाम मागण्या दुबार नावे संपूर्णपणे पुन्हा तपासावीत — फक्त २५% नव्हे, १००%,
मयत व्यक्तींची नावे तत्काळ यादीतून काढावीत ,परत सर्व प्रभागनिहाय यादी तयार करावी ,BLO मार्फत पडताळणी व घरभेटी प्रक्रिया सुरू करावी हरकतींवरील मुदत वाढवावी ,राजकीय पक्षांना घेऊन उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी त्यानंतरच अंतिम यादी जाहीर करावी
लोकशाही मार्गाचा कठोर इशारा वरील मागण्या लागू न झाल्यास
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे नाशिक महानगरपालिकेच्या व राज्य निवडणूक आयोग विरोधात तीव्र आंदोलन उभारेल निवडणूक प्रक्रियेवरील बहिष्काराचा गंभीर पर्याय आमच्या समोर राहील
यामुळे उद्भवणारी संपूर्ण कायदेशीर व प्रशासनिक जबाबदारी नाशिक महानगरपालिका व राज्य निवडणूक आयोगावर राहील
ही मागणी सामान्य नागरिकांचा, मतदारांचा, लोकशाहीचा आणि नाशिकच्या सन्मानाचा प्रश्न आहे.
तातडीने वस्तुनिष्ठ निर्णय घेऊन योग्य दुरुस्ती करावी ही कणखर विनंती.
प्रत माहितीसाठी रवाना मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग मुंबई महाराष्ट्र नाशिक जिल्हाधिकारी
निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते महानगरप्रमुख प्रथमेश गीते बाबा साहेब गायकवाड जिल्हा सचिव मसूद जिलानी, महिला जिल्हाप्रमुख स्वातीताई पाटील उपजिल्हाप्रमुख महेश बडवे दिलीप मोरे महानगर संघटक सचिन बांडे शैलेश सूर्यवंशी, देवा जाधव , सुनील विष्णू जाधव विद्यार्थी सेनेचे वैभव ठाकरे युवती सेना चे योगिता ताई गायकवाड महिला आघाडीच्या सुवर्णा काळुंगे, युवा युवती सेनेच्या मधु पाटील शोभा वाढवे शोभा दिवे चित्रा ढिकले, सरप्रीत सिंग साबी अमित कंटक योगेश देशमुख सागर निकाळे स्वप्निल आवटे निलेश शिरसाठ आकाश उगले, सुदर्शन चंदनानी अतुल धोबळे कल्पेश पिंगळे बबलू साबळे रामदास आहेत राकेश साळुंखे सुभाष शेजवळ सीमा बर्दे गुड्डी रंगरेज सिंधुताई वाघ तृप्ती बोरसे सुनील पाटील अश्विन पवार प्रमोद नातेकर शरद दातीर आधी पदाधिकारी महिला आघाडी आणि कृषी संघटनेचे शिवसैनिक उपस्थित होते
