जव्हार मध्ये बंजारा व धनगर समाजाने केलेल्याअनु.जमातीत आरक्षण मागणीच्या विरोधात आदिवासी सामाजाचा मोर्चा. प्रतिनिधी राजू पागी पालघर जव्हार मध्ये अनु.जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याचा मागणीला तीव्र विरोध करत युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.३०/०९/२०२५ रोजी सकाळी १०वाजता जव्हार शहरात आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात तारपा चौकातुन झाली तर समारोप आदिवासी क्रांतिकारक चौकात करण्यात आला.”घरी सडुन मरण्यापेक्षा ‘रस्तावर लढुन मेलेला बरं”अशा जोशपुर्णं घोषणांनी शहराचा गजर दुमदुमून गेला.
मोर्चात यूवा आदिवासी संघ तसेच विविध आदिवासी संघटना, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या मध्ये आमदार हरीचद्रं भोये, माजी आमदार सूनिल भुसारा, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम, युवा अध्यक्ष संदीप माळी, कार्याध्यक्ष कपिल वाढू, प्रवीण अवतार युवा खजिनदार, सचिन शिंगाडा ,सुरेखा थेतले,माजी सभापती विजया लहारे, विनायक राऊत, माजी सभापती प्रदिप वाघ , यशवंत बुधर , बळवंत भोईर, युवा कार्याअध्यक्ष विनु दादा मौळे, माजी युवा अध्यक्ष राजु भोये, एकनाथ दरोडा, हेमंत घेगड यांच्या सह जव्हार, मोखाडा,विक्रमगड सरपंच संघटना, माजी जिल्हा परिषद सदस्य , माजी पंचायत समिती सदस्य, यूवा नेते, राहुल घेगड, रोहीत मौळे,संजय रानडा,दिपक भोये,नरेश कुवरा,अमित डोके,चेतन कव्हा, महिला व युवा वर्ग, होस्टेल मधील विद्यार्थी, तसेच जेष्ठ नागरिकांचा सहभाग होता.
या मोर्चा साठी जव्हार तालुक्या्सह पालघर व नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावून सरकारला ठाम इशारा दिला.
