सद्भावना व मैत्रीचा संदेश देत शांतीदूत रत्नाकर शेजवळ आफ्रिका खडांच्या यात्रेवर
प्रतिनिधी वसीम पठाण नाशिक
नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेचे आंतरराष्ट्रीय सायक्लिस्ट रत्नाकर शेजवळ हे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शांती सद्भावनेचा सदेंश देत केन्या देशाच्या यात्रेवर असुन किटांनी येथे विपश्यना केंद्रात दोन दिवस धम्मसेवा देवुन ते नौरोबी,मोबांसा,लेक नाकुरू,आबोंसली ,मसाईमारा येथे भेट देवुन ते शातीं व मैत्रीचा संदेश देणार आहेत .त्यांना या यात्रेकरीता प्रणय वाळुंद्रे (नागपूर),राजेश उबंरकर (दुबई) व गुणवंत चव्हाण (नाशिक) यांचे विशेष सहकार्य लाभले, या आधी रत्नाकर शेजवळ यांनी स्नेहालय चे मा.गिरिष बाबा कुळकर्णी यांनी आयोजित केलेली अहमदनर(महाराष्ट्र) ते नौखाली (बांग्लादेश) सद्भावना सायकल रैली यशस्वी पणे पुर्ण केली आहे. तसेच मा.सुर्यकांत भिसे आयोजित पंढरपूर ते घुमान
(पंजाब )मार्गाने कर्तारपुर (पाकिस्तान) संत नामदेव यांच्या जयंती दिनी प्रेम व शांती चा संदेश देत सायकल रैलीत सहभाग घेतला होता. तसेच डॉ. आबा पाटील
रॉयल रॉयडर द्वारे आयोजीत मनाली ते लेह या आझादी का अमृत महोत्सव सायकल मोहीमेत तसेच मराठी शौर्य दिना निमित्त आयोजीत पानिपत ते नाशिक सायकल साहस मोहीमेत देखील सक्रिय सहभाग घेतला होता.
रत्नाकर शेजवळ हे गेल्या ऐकवीस वर्षा पासुन शांती व सद्भावनेचा सदेंश देत आहेत . त्यानीं भारतातील 27 राज्ये व महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांना भेटी दिल्या त्यापैकी त्यांनी 18 राज्य व 20 जिल्ह्यातील प्रवास सायकल वर “सारे भेद सोडूया माणुस माणुस जोडूया “हा संदेश देत केला असून त्यानीं नेपाळ,भुटान ,म्यानमार,श्रीलंका, थायलंड, वियेतनाम ,पाकिस्तान देशात देखील शातीं सद्भावना व मैत्री चा संदेश दिला आहे.त्यांना गेल्या वर्षीचा नूतन गुळगुळे फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.केन्या देशाचा दौरा अटोपताच ते उझबेकिस्थान,ताझिकस्थान,किर्गिझस्थान या देशाच्या यात्रेवर जाणार आहेत.
