धनादेश अनादर झाल्याने नाशिक येथील न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली.
प्रतिनिधी अशफाक यु शेख नासिक फिर्यादी श्री.जुनेद उमर शेख राहणार पखाल रोड,नाशिक यांनी श्री. महेश वसंतराव सावंत मु.पो.नामपूर ता.सटाणा जि नाशिक यांचे विरूद्ध निगोशिएबल इनसटुमेंट कायद्याच्या कलम १३८ अन्वये नाशिक येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट क्रमांक २ श्री.एस.के.देवकर साहेब यांच्या न्यायालयात क्रिमिनलकेस दाखल केली होती. सदरचे प्रकरणांना मध्ये मे.कोर्टाने दोन्ही बाजूचे पुरावे व साक्ष तपासून आरोपी श्री.महेश वसंतराव सावंत यांना साधी चार महिन्याचा कारावासाची शिक्षा व तसेच फिर्यादीला काॅमपेनसेशन म्हणून रक्कम रू.१.८६,७२५/- निकालापासून तीन महिन्याच्या आत देण्यास आदेश पारीत केलेले आहे. जर आरोपीने सदरचे पैसे मुद्दतीत फिर्यादीला अदा केले नाही तर, अजून सहा महिन्याची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणा मध्ये फिर्यादी तर्फे नामवंत वकील श्री.मतिनोद्दीन राजीयोद्दीन काजी यांनी बाजू मांडली.
