मेहुणेबारे पोलीस स्टेशनकडून अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करून धारदार शस्त्रे जप्त केले प्रतिनिधी प्रशांत जोशी चाळीसगाव जिल्हा पोलीस अधीक्षक मा डॉ श्री महेश्वर रेड्डी सो.अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा श्रीमती कविता नेरकर सो. व उपविभागीय पोलीस अधिकारी.चाळीसगाव उपविभाग मा श्री विजयकुमार ठाकूरवाड सो.यांनी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे बाळगून दहशत करणाऱ्या इसमांवर कारवाया करणे बाबत मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या आज दिनांक ०२/०८/२०२५ रोजी मेहुणेबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दोन इसम हे त्यांच्या ताब्यात अवैध शस्त्रे बाळगून दहशत करीत असले बाबत माहिती प्राप्त झाली होती सदर गोपनिय माहितीच्या आधारे इसम नामे (१) शुकलाल सुरेश सोनवणे (२) किरण यशवंत सोनवणे दोघे रा. उंबरखेड ता. चाळीसगाव हे भिका सिताराम गायकवाड यांचे घर उंबरखेड ता. चाळीसगाव येथे विनापरवाना अवैधरीत्या एक धारदार लोखंडी तलवार व एक धारदार लोखंडी कुकरी अशी धारदार शस्त्रे स्वतःजवळ बाळगताना त्यांना मिळून आले असता त्याबाबत पंचा समक्ष सविस्तर पंचनामा करून नमूद इसमांकडून सदरची शस्त्रे जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर दोन्ही आरोपीतां विरुद्ध मेहुणेबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १८६/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मेहुणेबारे पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कामगिरी मा. वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री सुहास आव्हाड पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शिरोळे पोलीस हे कॉ. मोहन सोनवणे कुशल शिंपी बाळासाहेब पगारे पो. कॉ विनोद बेलदार भूषण बाविस्कर चा.पो.कॉ.ईश्वर देशमुख यांनी केली आहे तरी चाळीसगाव व परिसरातील युवकांना सुचित करण्यात येत आहे की अशा प्रकारे विनापरवाना अवैध शस्त्रे जवळ बाळगून दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच चाळीसगाव व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की असे कृत्य निर्धार असा निदर्शनास आल्यास त्याबाबत मेहुणेबारे पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्ष जळगाव येथे कळवावे
